कॉलेज, शाळा आणि हॉस्टेल यात जे कॅरम असतात त्याने सराव होत नाही याचं कारण म्हणजे ते चॅम्पियन बोर्ड प्रकारातील नसतात. तेथील स्पर्धा सुध्दा आपापल्या नियमाप्रमाणे होतात. कॅरमला बोरीक पावडर लागत असते, ज्यामुळे कॅरमची सर्फेस गुळगुळीत राहण्यास मदत होते, पण यातही बारीक पावडर सोडून चुकीची पावडर अनेक ठिकाणी वापरतात. चुकीची म्हणजे ज्याने प्रमाणापेक्षा कॅरम गुळगुळीत होऊन जातो अशी. त्या पावडरला छर्रा किंवा डिस्को पावडर म्हणतात.
मी जसं म्हणालो, आपापले नियम म्हणजे काय तर एक प्रामुख्याने असतो तो म्हणजे thumb allowed नसणे आणि दुसऱ्याची सोंगटी direct मारू न शकणे. या दोन नियमांना फाटा देऊन मी जिथे गेलो तिथे म्हणजे कॉलेज - हॉस्टेल तिथे-तिथे स्वतः योग्य पावडर आणली आणि कॅरमच्या मुळ नियमाप्रमाणे खेळणं सुरू केलं. सुरवातीला माझं एकायला किंवा माझ्यावर विश्वास ठेवण्यासाठी, एक तर माझा थोडाफार चांगला गेम कामी आला जेणेकरून समोरच्याला पटलं की हा खेळाडू आहे असे आणि दुसरं youtube वर अनेक चॅनेल आहेत जे स्पर्धेचे प्रक्षेपण करतात. एखादा व्हिडिओ काढून दाखवायचो की बघा थंब allowed आहे, डिफेन्स म्हणजे दुसऱ्याच्या सोंगटीला direct मारू शकतो वगैरे वगेरे....
आत्ता काल परवा कंपनीच्या स्पोर्ट क्लब मध्ये गेलो तिथेही तोच अनुभव आला. कॅरम एकदम साधे, पावडर एकदम वेगळी. करोडोचा सुंदर क्लब पण तिथेही हीच गत.
मला वाटतं आपण ज्याला माहिती आहे त्याला एखादी गोष्ट का विचारू नये? प्रत्येक गोष्ट तर आपल्याला माहीत असणं हे दुरान्वयेही शक्य नाही.
यामुळे मग हे होत की खरा गेम मागे पडतो. हेतू ठेवून, नियमाप्रमाणे आणि योग्य साधनांवर खेळले की सर्वार्थाने गेम develop होईल.
इथले कस्तुरे काका मला म्हटले की कॅरमचा प्रत्येक डाव फोडल्यावर unique (वेगळा) निर्माण होतो. म्हणजे तुम्ही कितीही वेळा ब्रेक करा (फोडा) पण प्रत्येकवेळी एक नवीन पोझिशन निर्माण होते. आयुष्याचे असेच आहे, येणारा प्रत्येक दिवस हा काहीतरी नाविन्य आणतो, नवे चॅलेंज आणतो.
कॅरमशी नकळत आयुष्याशी तुलना करणारे अनेक असतील. तुम्ही एखादया कलेत प्रावीण्य मिळवलेले असल्यास तुम्हीही अशाचप्रकारे त्याची आयुष्याशी तुलना कधी तरी केली असेलही.
नियम माहीत नसणे, योग्य साधने पैशाअभावी नाही तर माहिती अभावी न वापरणे यातून समाजाचे एक प्रतिबिंब दिसतं.
No comments:
Post a Comment