ट्रेनचा प्रवास कोणासाठीही नवीन नाही .
मी साधारण २०१७ ते आत्तापर्यंत म्हणजे २०२२ पर्यंत ट्रेनने अनेक ठिकाणी गेलो आहे .
ट्रेनचा प्रवास सुखकर होण्यासाठी जर मला काही टिप्स द्याव्या वाटतायेत त्या म्हणजे
1. "Where is my train" आणि "ixigo" हे दोन अँप इन्स्टॉल असू देत.
2. बुक केलेली ट्रेन मागील काही दिवसांत कोणत्या वेळेत पोहोचते , किंवा लांब पल्ल्याच्या गाडीचा मागील काही दिवसांचा तुमच्या स्टॉपचा time चेक करणे केव्हाही चांगले . उदाहरणार्थ … नाशिकहून मुंबईला जायचे आहे आणि ट्रेन दिल्ली वरून येत आहे तर ती नाशिकला यायला लेट तर होत नाही ना किंवा लवकर तर येत नाही ना हे चार - दोन तास अगोदर अँपच्या माध्यमातून पाहायला पाहिजे .
3. ट्रेनचा प्लॅटफॉर्म अँप मध्ये आणि नंतर रेल्वे फलाटावर डिजिटल बोर्डात एकदा चेक करून साधारण एक तास अगोदर प्लॅटफॉर्म वर जाणे.
4. या अँपवर रेल्वेची पोसिशन अगोदरच दिलेली असते . म्हणजे स्लीपर कोच कुठे , AC कुठे वगैरे ... नंतर ट्रेन येण्याच्या अगोदर साधारण १० मिनिटे अगोदर तुमच्या कोचची करेक्ट पोसिशन प्लॅटफॉर्मवरील चौकोनी डिजिटल बोर्डात दिसते .
5. मला शक्यतो upper सीट आवडते. Lower घेतल्यावर एखादी वयोवृद्ध महिला वगैरे येते आणि तिला ते द्यावे लागते कारण तिला तिच्या Upper वर चढण्यासाठी प्रॉब्लेम येतो. शिवाय sideच्या सीट्सवर येणाऱ्या-जाणर्यामुळे खूप disturbanceअसतो.
6. एक भरलेली पाण्याची बाटली विकत घेऊन ठेवावी . तिचा वापर सकाळी टॉयलेट करतानाही करता येतो .
7. सीट बदलायची कोणी विनंती केली तर खात्री करावी सीट RAC आहे कि कोणती ते . शिवाय टॉयलेटच्या जवळच्या दोन्ही कंपार्टमेंटमध्ये शक्यता exchange करू नये असे वाटते .
8. मोबाइलला किंवा तत्सम वस्तू चैन असलेल्या पॅन्टच्या खिशात ठेऊनच झोपावे अन्यथा झोपेत खिशातून हमखास पडतात. नाहीतर सरळ bag मध्ये ठेवावे आणि बॅग डोक्याशी घेऊन झोपावे.
9. काही रोख रक्कम खिशात आणि काही bag मध्ये राहू द्यावी . झोपताना चष्मा नीट कव्हर मध्ये बंद करून बॅगमध्ये ठेवावा.
10. सहप्रवाश्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करावा . प्रवास लहान होतो. मात्र शक्यतो कुणाला जास्त वैयक्तिक माहिती पुरवू नये.
11. प्रवासा अगोदर मोबाइल मध्ये तिकिटाची सॉफ्ट कॉपी काढून ठेवावी.
12. तिकीट कन्फर्म नसेल तर एजन्ट चा नुंबर असू द्यावा . तो ऐनवेळेस काढून देऊ शकतो .
13. बरेचदा मी मनमाड वरून जर दुसरी ट्रेन असेल तर नाशिकहून एखाद्या ट्रेन चे तिथपर्यंचे तिकीट काढतो आणि प्लॅटफॉर्म वर गेल्यावर जी ट्रेन लवकर येईल तिच्यात चढून मनमाडपर्यंत निघून जातो .
14. रात्री ट्रेनची विंडोची मेटल खिडकी सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवावी.
15. मध्यरात्री चढत असताना बरेचदा ट्रेनचे दरवाजे बंद असतात अशावेळी बाजूच्या कोचचे चेक करावे . तिथून एन्ट्री घ्यावी .
16. जर ट्रेन तुमच्या स्थानकातूनच सुटणार असेल तर ट्रेन लागल्या-लागल्या लगेच चढू नये . ट्रेनचे lights लागल्यावर आत प्रवेश करावा (व्हेंटिलेशन उत्तम झाल्यावर )किंवा इतर सगळ्या लोकांना खिडक्या उघडू द्याव्या.
17. नॉर्थच्या ट्रेन पेक्षा south च्या ट्रेनमधील crowd यात फरक पडतो . नॉर्थ side मध्ये स्लीपर कोच मध्ये सुद्धा बरेचदा गर्दी वाटते .