Sunday, February 19, 2023

पर्याय

मानसशास्त्र सांगते की,  व्यक्तीकडे पर्याय असतील तर त्याची मनस्थिती द्विधा होते. याउलट एकच कोणता पर्याय समोर असेल तर गोष्ट परिणामी सोपी असते . 

माझा भाषेबद्दलही असाच गोंधळ झालेला आहे . आज अनेक म्हणजे ३-४ पर्याय माझ्याकडे आहेत . प्रामुख्याने इंग्लिश, हिंदी आणि मराठी . हा गोंधळ काही माझा एकट्याचा निश्चितच नसेल . एखादी साधी पोस्ट सोशल मीडियावर टाकायची तर ती कोणत्या भाषेत ठेवावी असा प्रश्न पडतो . इथे ब्लॉगरवरसुद्धा काहीतरी लिहायचं तर कोणत्या भाषेत लिहावं हा एक प्रश्न पडलाच होता . 

काहींना मराठी येते , काहींना इंग्लिश येते तर काहींना हिंदी येते . मात्र या तीन भाषेत ९९% लोकं समाविष्ट होतात . १००% न म्हणता १% कमी यासाठीच की प्रत्येक गोष्टीला अपवाद असतातच . साबणाच्या किंवा टूथपेस्टच्या advertise मध्येसुद्धा जंतू १००% कुठे मरतात. 

शेवटी मराठीच जास्तीजास्त खरबडायचे ठरवलंय . आपल्या मातृभाषेला आपल्या प्रदेशाची चव असते हे एक कारण असलं तरी आज सगळीकडे चांगल्याप्रकारे कोणत्याही भाषेतून कोणत्याही भाषेत भाषांतराची सोय उपलब्ध आहे. कोणाला काही वाटलंच तर तो पटकन भाषांतर करू शकतो . 

लिखाणातील भाषेला जसा पर्याय आहे तसा लिखाणाला काय पर्याय होऊ शकतो का याचाही नकळत शोध सुरु होता . काही गोष्टींना पर्याय नसतो आणि मग पर्याय नसणाऱ्या गोष्टी सोप्या होतात असे वाटते . जुन्या मित्रांशी , व्यक्तींशी बोलल्यावर भेटल्यावर जसं बर वाटत ना तसंच कधी लिखाणाने वाटून जातं. 

No comments:

Post a Comment

Pappa @60