Friday, December 3, 2021

मनोयुग चिरायु भव !

"मनोयुग" हे माझा शालेय वर्गमित्र चिन्मय पळसोदकर याने पुढाकार घेऊन स्थापन केलेले मानसिक आरोग्यकेंद्र आहे. त्याने त्याचे पूर्ण नाव सध्या "मनोयुग भारतीय सायकॉलॉजि स्टुडिओ " असे ठेवले आहे . 

आमचे रोल नंबर जवळ-जवळ होते हा एकमेव समान धागा मनोयुगच्या आधी होता. 

मग फार वर्षांनी मला रोहनने चिन्मयशी एकदा बोलणे करून दिले, चिन्मयची नवीन ओळख सांगितली. त्याच्या मनोयुगच्या कामाबद्दल सांगितले. शाळा सोडून ८- ९ वर्षांनी मग भेटण्याचा योग मग मनोयुगमुळे आला. 

मनोयुगमध्ये वेगवेगळे प्रयोग चालू असतात. मानसिक आरोग्यकेंद्र म्हटल्यावर अनेकांच्या भुवया उंचावतात. मला आठवतं आमच्या घरात कोणासाठी तरी एक स्थळ आलं होत आणि एका नातेवाईकाचा नाराजीचा सूर हा होता की मुलीने मानसिक स्वास्थ्यासाठी कुठेतरी ट्रीटमेंट घेतली आहे. थोडक्यात काय तर ती स्वीकार्य असू शकत नाही . 

तर अशा काळोखात मनोयुग प्रवास करत आहे. प्रश्न आहेत पण त्याचेकडे उत्तर आहे असे वाटते. 

चिन्मयचे मनोयुगचे live सेशन्स असतात. मस्त इंटिरियर असलेले एखादे कॅफे हा त्याचा अड्डा असतो. मी त्याचे पहिले सेशन जे अटेंड केले ते "ओशो" या व्यक्तिमत्त्वाबद्दल होते. सर्वप्रथम त्याने सगळ्यांचा इंट्रो घेतला. मी माझा इंट्रो दिल्यावर त्याने परत त्याच्यापरीने माझा परिचय करून दिला होता.  

जी माणसे आतून सुंदर राहतात ना ती सुंदर दिसतात असे मला वाटते. जगात सुंदरता ठासून भरली असल्याचा पुरावा इथे पहिल्यांदा मिळाला. एखादा प्रश्न चिन्मय विचारतो आणि त्यावर अनेक जणांची त्या प्रश्नासाठीची , त्या वेळेपुरतीची संलग्न मत ऐकायला मिळतात. इथे चिंतन घडते. फेसबुक, व्हाट्सअँप च्या जमान्यात एखाद्या विषयावर वाहून घेतलेल्यांना live भेटणे माझ्यासारख्यासाठी confort zone मधून बाहेर येण्यासारखे असते. 

मनोयुगच्या आणखी एका प्रयोगाचा मी पार्ट होतो. तो म्हणजे MSRC. MSRC म्हणजे "Milind Soman Running Club". चिन्मयने एक व्हाट्सअँप ग्रुप बनवला होता आणि सगळे जण तेथे आपण रोज शरीरासाठी जो वेळ देत आहोत तो कशाप्रकारे देतो आहोत ते फोटोच्या किंवा व्हिडिओच्या माध्यमातून टाकत असतं. कालांतराने प्रत्येकाचा कामाचा व्याप इतका वाढला की नाईलाजाने तो बंद पडला. बरेचदा मानसिक प्रश्नाचे उत्तर शरीर स्वास्थ्याशी निगडित असल्याचे चिन्मय म्हणतो. या क्लब मुळे  मी running ला सुरवात केली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. नीट घराबाहेर पडू लागलो. याचा अजून एक फायदा असा झाला की माझे running चे व्हाट्सअँप स्टेटस update बघून विजयला मला वाढदिवशी smartwatch गिफ्ट द्यावे वाटले. 

"तपिश" ही चिन्मयची अशीच एक भन्नाट कल्पना आहे. Mutual compatible dating culture भारतात रुजवण्याचा प्रयत्न तो करतो आहे. 

याव्यतिरिक्त मनोयुगचे अनेक online सेशन्स होत असतात. वेळ काढून मी ते अटेंड करायचा प्रयत्न करत असतो. एकदा कोजागिरीच्या रात्री उर्दू poetry वर एक सेशन घेतले, अगदी काल-परवा बाबासाहेब पुरंदरेंसारखा कर्मयोगी गेल्यावर त्यांचेप्रीत्यर्थ त्याने एक सेशन घेतले. धकाधकीच्या जीवनात आपल्या आजूबाजूला कोण राहतो हे आपल्याला बघावेसे वाटेनासे झाले असताना मनोयुग आणि चिन्मयची संवेदना तेवत असल्याने अचंबित व्हायला होते . चिन्मय एक कलाकार माणूस आहे हे सांगावेसे वाटते, शाळेत असताना त्याने एकपात्री प्रयोग केला होता तो अजून स्मरणात आहे.  

भरभरून सोनं वाटणाऱ्या मनोयुग आणि चिन्मयला खूप साऱ्या शुभेच्छा 

अजून एक गोष्ट म्हणज मनोयुगचे social media handle वरचे  स्टेटस असो किंवा एखाद्या सेशन साठीचे pre-announcement स्टेटस असोत ते खूप deep असतात. कधी-कधी त्याने टाकलेल्या एखाद्या quote ने आपल्याला नवीनच दृष्टिकोन मिळत जातो. Unlearning आणि loving the other-self  या संदर्भातले त्याने टाकलेले असेच quote खूप resourceful असल्यागत वाटतात.  

मग काय करताय ना follow मनोयुगला ?!

- विनय नांदुर्डीकर (मनोयुग साधक) 

2 comments:

Pappa @60