गटाका Gattaca (1997) सिनेमाबद्दल
अँड्रू निकोल (Andrew Niccol) याने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे . त्याचा (ट्रू मॅन शो ) Trueman show ज्यात (जिम कॅरि) Jim Carrey आहे तो पण अप्रतिम आहे .
चित्रपटामध्ये असं दाखवले आहे की, एखादा मुलगा जन्माला आल्या - आल्या तो किती वर्ष जगेल, त्याचा IQ, EQ कसा व किती असेल हे समजेल.
त्याप्रमाणे हिरो फक्त तीस वर्ष जगेल आणि आणि शारीरिक दृष्ट्या तो कमकुवत असेल असे दाखवण्यात आले आहे . जस-जसा हिरो मोठा होतो, त्याला नासामध्ये जावेसे वाटते आणि त्यासाठी तो कशा पद्धतीने नासामध्ये जातो, तेथे राहतो, काम करतो हे चित्रपटांमध्ये दाखवले गेले आहे.
तो त्याची जी मूळ आयडेंटिटी (स्वभाव) आहे ती लपवतो आणि दुसर्या एका सुपीरियर व्यक्तीची आयडेंटिटी घेतो. एकदम शेवटचा जो सीन आहे आहे त्यामध्ये तो पृथ्वीबाहेर मिशन वरती निघालेला असतो आणि पृथ्वीवर शेवटी एका ठिकाणी त्याचं पुन्हा एकदा आयडेंटिटी व्हेरिफिकेशन करण्यात येते. व्हेरीफिकेशन करणारा असतो तो त्याला दाखवून देतो की तुझी जी मूळ आयडेंटिटी आहे ती मला माहित आहे. त्याला तो सांगतो की माझा मुलगा तुझा चाहता आहे.
इतकी सगळी कसरत ! आणि मग शेवटी अभिमानाने तो परग्रहावर जायला निघतो...
No comments:
Post a Comment